ई-पीक पाहणी ॲप 3.0 : शेतकऱ्यांसाठी 24/7 उपलब्ध(E-Peek Pahani App 3.0 : Available 24/7 to Farmers)
प्रस्तावना(Introduction):
भारतातील शेती क्षेत्रात बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि प्रभावी कृषी व्यवस्थापन साठी ई-पीक पाहणी ॲप (E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामात अनेक सोयी मिळाल्या आहेत.
सन 2024 च्या खरिप हंगामासाठी १ ऑगस्ट २०२४(1 August 2024) पासून ई-पीक पाहणी (E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) सुरू होत आहे, या लेखात आपण ई-पीक पाहणी ॲप काय आहे, ते कसे काम करते, त्याचे फायदे आणि आव्हाने यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. नेमकी ई-पीक पाहणी का करायची, कशी करायची, कधी करायची हे समजुन घेऊयात.
ई-पीक पाहणी ॲप काय आहे?
ई-पीक पाहणी हे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने(Land & Revenue Department) विकसित केलेले एक मोबाईल ॲप आहे. या ॲपचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी सोप्या पद्धतीने करण्याची सुविधा प्रदान करणे हा आहे. याशिवाय ॲपमध्ये(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) शेतातील झाडे, पडीक जमीन इत्यादींचीही नोंदणी करता येते.
ई-पीक पाहणी (E-Pik Pahani) २०२४(2024) ची नोंदणी करण्याची अंतिम मुदत काय आहे?
२०२४(2024) साठी ई – पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२४ (15 September 2024 आहे.)
ई-पीक पाहणी ॲपचे मुख्य वैशिष्ट्ये:
-
स्वयं पिक नोंदणी: शेतकरी आपल्या पिकांची नोंदणी स्वतः करू शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
-
GPS आधारित नोंदणी: ॲपमध्ये जीपीएसचा वापर केला जातो. त्यामुळे पिकांची नोंदणी अचूक पद्धतीने होते.
-
झाडे, पडीक जमीन इत्यादींची नोंदणी: शेतकरी आपल्या शेतातील झाडे, पडीक जमीन इत्यादींचीही नोंदणी करू शकतात.
-
सरकारी योजनांचा लाभ: या ॲपमध्ये(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) नोंदणी केलेल्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सोपे जाते.
-
स्वयंसेवी संस्थांचा सहयोग: ॲपमध्ये स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा मिळते.
ई-पीक पाहणी (E-Pik Pahani) सन 2023 चा आढावा:
सन 2023 मध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आपल्या पिकांची नोंदणी पीक पेरा(Pik Pera) करून या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. गतवर्षी खरीप हंगाम(Kharip 2023 ) मध्ये ९९ लाख ५७ हजार ९४४ हेक्टर, रब्बी हंगामामध्ये २२ लाख, ५२ हजार ५६ हेक्टर, उन्हाळी हंगामामध्ये २ लाख ९१ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर तर बहुवार्षिक पिकांतर्गत ४४ लाख १२ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍप(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers)द्वारे पिकांची नोंदणी केली आहे.
त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी ॲप(E-Pik Pahani App ) द्वारे ४०० च्यावर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी(Crop Registration) घेण्यात आलेल्या असून खरीप हंगाम 2024 करीता राज्यात ई-पीक पाहणी(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) मोबाईल अँप्लिकेशनद्वारे नोंदविण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२४(1 August 2024) पासून सुरु होत आहे.
ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या 2023 मधील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी(E-Pik Pahani) मोबाईल अप्लिकेशनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, हे E-Peek Pahani New Version 3.0 ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ करण्यात आलेले आहे. यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन व्हर्जन-3.0(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) विकसित करण्यात आले असून, हे सुधारित ऍप 1 August 2024 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी 3.0 सुधारित ॲप लिंक (E-Peek Pahani 3.0 Application Link):
ई-पीक पाहणीमध्ये नोंदीसाठी मोबाईल ॲप व्हर्जन-3 या ॲपची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी (E-Peek Pahani ई-पीक पाहणी(DCS) मोबाईल ॲप व्हर्जन-3.0 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे.
ई-पीक पाहणी 3.0 सुधारित ॲपची अधिक माहिती:
सुधारित मोबाईल ॲपमध्ये (E-Pik Pahani New Version 3.0) राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश(Latitude and Longitude- Geo Tagging) समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र(Crop Photo) घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत माहितीमध्ये स्वयंघोषणापत्र (Self Decleration) घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल अप्लिकेशनने केलेली ई-पीक पाहणी(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) ४८ तासामध्ये(48 hours) स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.
या पूर्वीच्या मोबाईल ॲपमध्ये(E-Pik Pahani Old Application )असलेल्या मुख्य पीक(Main Crop) व दोन दुय्यम पिके(Secondary Crop) नोंदविण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक(Pik Pera Date ) , हंगाम(Season) व क्षेत्र(Area) नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी कार्यालयाकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.
वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल ॲप(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये ‘मदत’(E-Peek Pahani Helpdesk) हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणावर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न(E-Pik Pahani FAQ’s )व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. याचा वापर करून शेतकरी ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील.
शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १०%(10%) नोंदीची पडताळणी(Crop Verification )तलाठ्यांमार्फत करण्यात येणार असून, तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील. तलाठी यांच्यामार्फत तपासणी केल्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.
ई-पीक पाहणी ॲप आणि किमान आधारभूत किंमत(MSP):
किमान आधारभूत योजनेअंतर्गत(MSP) येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
महत्वाची सूचना(Important Notice):
प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई-पीक पाहणी ॲपद्वारे(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) नोंदविणे गरजेचे आहे कारण ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा(Crop Insurance) व पीक विमा दावे(Crop Insurance Claim) निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप(Crop Loan), नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सुधारित मोबाईल ॲप(E-Pik Pahani New Version 3.0) आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण केल्यास त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरू शकेल.
टिप :- पीक विमा भरतांना ई-पीक पाहणी करणे गरजेचे नाही.(E-Peek Inspection is not required while submitting Crop Insurance.)
ई-पीक पाहणी ॲप आणि जमीन महसूल नोंदणी:
ई-पीक पाहणी ॲप जमीन महसूल नोंदणी प्रणालीशी संलग्न आहे. यामुळे शेतकऱ्यांची जमीन आणि पिकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. यामुळे शासनाला योजनांचे प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे जाते.
ई-पीक पाहणी ॲप आणि गोपनीयता:
शेतकऱ्यांची माहिती गोपनीय ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. ई-पीक पाहणी ॲपमध्ये(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) या गोष्टीची विशेष काळजी घेतली जाते. शेतकऱ्यांची माहिती सुरक्षितपणे संकलित आणि संग्रहित केली जाते.
ई-पीक पाहणी ॲपचे वापरकर्ता अनुभव:
ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना वापरण्यास सोपे आहे. ॲपचे इंटरफेस साधे आणि समजण्यास सुलभ आहे. शेतकऱ्यांना ॲप वापरण्यासाठी कोणत्याही विशेष तंत्रज्ञानाची गरज नाही.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सहाय्य:
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप(E-Peek Pahani App) प्रभावीपणे वापरण्यासाठी प्रशिक्षण आणि सहाय्य प्रदान केले जाते. कृषी विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन दिले जाते.
ई-पीक पाहणी ॲपचा वापर करण्यातील आव्हाने:
ई-पीक पाहणी ॲपचा वापर करण्यात काही आव्हाने आहेत. यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या, स्मार्टफोनची उपलब्धता, शेतकऱ्यांचा तंत्रज्ञान वापरण्याचा कमी अनुभव इत्यादींचा समावेश आहे.
ई-पीक पाहणी ॲप आणि शेतकऱ्यांची डिजिटल साक्षरता:
ई-पीक पाहणी ॲपचा(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) वापर करून शेतकऱ्यांची डिजिटल साक्षरता(Digital Literacy) वाढते. ॲप वापरण्याद्वारे शेतकरी तंत्रज्ञानाशी परिचित होतात आणि त्याचा उपयोग करण्यास शिकतात.
ई-पीक पाहणी ॲपआणि पिक नोंदणी:
ई-पीक पाहणी ॲपने पिक नोंदणीची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. आधी शेतकऱ्यांना पिक नोंदणीसाठी सरकारी कार्यालयाच्या चक्कर मारावी लागायची, पण आता ते घरबसल्याच आपल्या मोबाईलवरून पिक नोंदणी करू शकतात.
ई-पीक पाहणी ॲप आणि सरकारी योजनांचा लाभ:
ई-पीक पाहणी ॲपमुळे(E-Peek Pahani App 3.0 : 101% Benefit for Farmers) शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सोपे झाले आहे. ॲपमध्ये नोंदणी केलेल्या माहितीच्या आधारे शासन योग्य लाभार्थ्यांची निवड करू शकते.