मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024: लाखो महिलांचे सक्षमीकरण!
योजनेचा संक्षिप्त परिचय (Brief Introduction of the Scheme):
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024” (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) लाँच केली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाला चालना मिळणार आहे, तसेच त्यांच्यावर येणाऱ्या आर्थिक भारात कमी होण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी शासनाकडून अंदाजे 46,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत असा अंदाज आहे.
योजनेचा उद्देश आणि फायदे (Purpose and Benefits of the Scheme):
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे. या आर्थिक मदतीमुळे महिलांच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्थानासाठी मदत होईल, तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि चांगले आरोग्य यांची तरतूद करणे त्यांना शक्य होईल. या योजनेचा महिलांच्या सशक्तीकरणावर सकारात्मक परिणाम होईल आणि त्यांना समाजात सन्मानित स्थान मिळवण्यास मदत होईल.
पहिला हप्ता कधी मिळेल?
प्राप्त अंदाजित माहितीनुसार या योजनेचा पहिला हप्ता १९ ऑगस्ट, रक्षाबंधनाच्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे . हा हप्ता जुलै व ऑगस्ट मिळून १५००+१५००=३००० रु. एवढा असण्याची शक्यता आहे . अधिक माहितीसाठी जवळच्या सरकारी कार्यालयाशी किंवा अधिकाऱ्याशी सम्पर्क करावा.
पात्रता निकष (Eligibility Criteria):
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
2. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3. वय २१ वर्षे ते ६५ वर्ष.
4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
कोण ठरेल अपात्र?(Who will not be Eligible):
खालील निकषांमध्ये सांगितलेल्या व्यक्तींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही:
-
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,०००/- जास्त असल्यास.
-
कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता(Tax payer) असल्यास.
-
कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र/ राज्य/ सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचा कायम किंवा करारी कर्मचारी असल्यास.
-
सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे दरमहा रु.१,५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असल्यास.
-
जर कुटुंबातील कोणताही सदस्य पेन्शनधारक असेल.
-
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार आहे.
-
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/ बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष /उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
-
जर कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास.
-
घरात चारचाकी वाहन असेल तर(ट्रॅक्टर सोडून).
आवश्यक कागदपत्रे (Documents Required):
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन केलेला अर्ज.
२) आधार कार्ड झेरॉक्स प्रत.
३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला(Birth Certificate) आणि हे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षापूर्वीचे १. रेशनकार्ड झेरॉक्स प्रत २. मतदार ओळखपत्र झेरॉक्स प्रत ३. शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स प्रत यांच्यापैकी कोणतेही एक डॉक्यूमेंट.
४) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत), पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
६) पासपोर्ट साईज फोटो.
७) रेशनकार्ड झेरॉक्स प्रत.
८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
अर्ज कसा आणि कोठे करावा? (How and Where to Apply):
१ जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा मोबाइल ऍपद्वारे(नारिशक्तिदूत Mobile-App) अथवा सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. पात्रता निकषानुसार ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
A. ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी,
-
अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
-
वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) , सेतू सुविधा केंद्र यांच्यापैकी कोणत्याही केंद्रा मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती दिली जाईल.
-
Majhi Ladki Bahin Yojana 2024 साठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
-
अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
-
कुटुंबाचे रेशनकार्ड.
-
स्वतःचे आधार कार्ड.
B. ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येत असेल त्यांच्यासाठी,
महाराष्ट्र शासनाच्या जीआर(GR) नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज हे स्वतः अर्जदार महिला भरू शकतात किंवा नजीकच्या सेतू सुविधा केंद्राद्वारे भरू शकतात.
1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत Mobile-App वर अर्ज भरले आहेत, त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेत
पोर्टल लिंक – https://ladakibahin.maharashtra.gov.in/
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्रता निकष दिलेले आहेत त्यानुसार सर्व पात्र महिलांनी आपले अर्ज दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावे. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पैकी कोणत्याही सोयीस्कर प्रक्रियेने केले जाऊ शकतात.
अर्ज नाकारल्याची कारणे(Reasons Why Forms May Get Rejected):
1) अपूर्ण अर्ज.
2) आवश्यक कागदपत्रांची कमतरता.
3)चुकीची किंवा खोटी माहिती.
4)जॉइट अकाऊंट(Joint Account) चालत नाही.
5)पात्रता निकषांचे पालन न झाल्यास
6)हमीपत्र वर खाडा खोड चालत नाही.
7)आधारकार्ड आणि बँक अकाऊंट लिंक नसेल.
8)डॉक्युमेंट नीट दिसत नाही.
9)रेशनकार्ड नीट दिसत नाही.
10) आधारकार्ड ची मागची व पुढची बाजू जोडले नाही.
11) आधारकार्ड वर पूर्ण जन्म तारीख नाही.
12) फॉर्म मराठी मध्ये भरला(काही जिल्ह्यात Reject केले आहेत.)
13) आधारकार्ड वरचे नाव व पासबूक चे नाव सारखे नाही.
14) रेशन कार्ड मध्ये नाव नाही.
योजनेची अंमलबजावणी आणि माहिती:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 ही महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने विस्तृत यंत्रणा उभारली आहे. ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा स्तरावर या योजनेची माहिती देण्यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले आहेत.
योजनेची वैशिष्ट्ये:
-
नियमित हप्ते: पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये निश्चित रकमेचा हप्ता दिला जातो.
-
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT): हा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो.
-
पारदर्शकता: या योजनेची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध असते. लाभार्थी महिला आपला अर्जचा दर्जा ऑनलाइन पाहू शकतात.
-
जवाबदारी: या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था संयुक्तपणे काम करत आहेत.
-
लोकसहभाग: या योजनेतून अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा, यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी:
-
प्रचार: योजनेची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रचार मोहीम राबवली पाहिजे.
-
साधेपणा: अर्ज प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक असावी, जेणेकरून सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
-
तंत्रज्ञानाचा वापर: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अधिक प्रभावी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला पाहिजे.
-
महिला स्वयंसेविका: ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महिला स्वयंसेविका नियुक्त केल्या पाहिजेत.
-
नियंत्रण: योजनेच्या अंमलबजावणीवर नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास त्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे.
योजनेच्या यशासाठी नागरिकांची भूमिका:
-
जागरूकता वाढवा: आपल्या आजूबाजूच्या महिलांना या योजनेची माहिती द्या.
-
अर्ज प्रक्रिया सोपी करा: जर तुमच्या ओळखीच्या कुणालाही अर्ज भरताना अडचण येत असेल तर त्यांना मदत करा.
-
अनियमिततांची तक्रार करा: जर तुम्हाला योजनेत कोणतीही अनियमितता आढळली तर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.
योजनेचे आव्हान आणि भविष्यकाल:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 ही एक महत्वाकांक्षी योजना असली तरी, त्याच्या अंमलबजावणीत काही आव्हान आहेत. यामध्ये चुकीच्या माहितीचा समावेश, अर्ज प्रक्रियातील विलंब आणि काही भागात पुरेशी जागरुकता नसणे हे प्रमुख आव्हान आहे.
तरीही, महाराष्ट्र सरकार या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनेच्या यशासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांचा संयुक्त प्रयत्न आवश्यक आहे.
Credits to:
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
https://mahabharti.in/
https://govtschemes.in
https://majhiladkibahinyojana.com/
https://edistrictportal.com/
https://pmyojanaadda.com/
https://www.istockphoto.com/
https://www.canva.com/